Turkey earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) साधारण आठवड्याभरापूर्वी आलेल्या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात सर्वकाही एका क्षणात उध्वस्त झालं. रातोरात या देशातील लोकसंख्येपैकी हजारोंचा मृत्यू झाला. इतका करुण अंत कुणाच्याही नशिबात नको अशाच शब्दांत संपूर्णय जातून या आपत्तीनंतर हळहळही व्यक्त करण्यात आली. तुर्कीमध्ये हा भूकंप आलेला असतानाच इथं भारतातूनही चिंताजनक सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील 59 टक्के भूखंड भूकंपाच्या अनुशंगानं अतिसंवेदनशील आहे.
आठ राज्य आणि केंद्रशासिक प्रदेश भूकंपाच्या दृष्टीनं झोन 5 मध्ये येतात. जिथं सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. तर, देशाची राजधानी (Delhi) दिल्लीसुद्धा झोन 4 मध्ये येत असून ही धोक्याची बाब आहे. त्यामुळं ही माहिती सध्या चिंता वाढवणारी ठरत आहे.
लोकसभेतही या मुद्द्यावर चर्चा...
पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री, जितेंद्र सिंह यांनी काही वर्षांपूर्वी लोकसभेत या मुद्द्यावर प्रकाश टाकला होता. देशातील भूकंपांचा इतिहास पाहता भारतातील (Earthwuakes in india) साधारण 59 टक्के भूखंड हा विविध तीव्रतांच्या भूकंपांप्रती संवेदनशील आहे, असं ते म्हणाले होते.
सध्याच्या घडीला या आकडेवारीमध्ये झोन 5 मध्ये येणारा भूभाग धोक्यात असल्याचं स्पष्ट होत आहे. अभ्यासक आणि जाणकारांच्या मते इथं 9 रिश्टर स्केल इतक्या प्रचंड तीव्रतेचाही भूकंप येऊ शकतो. तर, झोन 2 असणाऱ्या भूभागांमध्ये कमी तीव्रतेचे भूकंप येतात. देशात सध्या 11 भूभाग झोन 5 अंतर्गत येत असून, 18 टक्के क्षेत्र झोन 4 मध्ये येतं. 30 टक्के क्षेत्र झोन 3 आणि उर्वरित भाग हा झोन 2 मध्ये येतो. भूकंपाचे थेट परिणाम मध्य हिमालय परिसरावर सर्वाधिक दिसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशातील झोन 5 क्षेत्रात कोणकोणत्या भागांचा समावेश आहे?
देशातील गुजरात (Gujrat), (Himachal Praesh) हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, बिहार, जम्मू काश्मीर (Jammu Kashmir), अंदमान निकोबार ही क्षेत्र झोन 5 मघ्ये येतात. त्यामुळं या भागांवर नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीकडून विशेष लक्ष ठेवण्यात येतं.
हिमालयात भूकंप झाल्यास... (Himalaya Earthquake)
हिमालयाचा मध्य भाग हा भूकंपाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असून, तिथं भूकंप झाल्यास त्यामध्ये मृतांचा आकडा मोठा असेल. इतकंच नव्हे तर नुकसानामुळं भविष्यातील अनेक वर्ष हा भाग मागे पडेल. 1905 मध्ये इथं असणाऱ्या कांगडा भागात प्रचंड मोठा भूकंप आला होता. 1934 मध्ये बिहार आणि नेपाळमध्ये भूकंप आला होता, याची तीव्रता 8.2 इतकी होती. तब्बल 10,000 नागरिकांचा या मृत्यू झाला होता. 1991 मध्ये उत्तरकाशीमध्ये 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता यामध्ये 800 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2005 मध्ये काश्मीरमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप आला होता ज्यामध्ये 80,000 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
Comments
Post a Comment