जागतिक आदिवासी दिनानिमित्त डहाणू येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे निलेश सांबरे यांच्या हस्ते लोकार्पण




डहाणू / पालघर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जामशेत या गावात आज भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते पार पडले.

आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याची प्रेरणा सतत समाजाल मिळावी त्यांचे इतिहासातील योगदान सदैव लक्षात राहावे या हेतूने यांचा एक पुतळा या गावाच्या चौकात असावा अशी डहाणूच्या जामशेत येथील आदिवासी समाजाच्या ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. या मागणीची पूर्तता करता जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या पुतळ्यासाठी पुढाकार घेतआकर्षक असा पुतळा बनवून घेतला व आदिवासी दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी तो लोकार्पण करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात निलेश सांबरे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला .

” बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील युवकांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांचे अमानुष अत्याचार सुरु असताना , आदिवासी समाजाची पिळवणूक होत असताना  आदिवासी समाजातील एक तरुण उठतो आणि या जुलमी इंग्रज राजवटी विरोधात उलगुलान पुकारतो ही गोष्ट साधी नाही . समाजाने अश्या महापुरुषांचा नेहमीच आदर्श घेतला पाहिजे अश्या भावना यावेळी निलेश सांबरे यांनी व्यक्त केल्या .

तर यावेळी जिल्हा विभाजन होवूनही आपल्या आदिवासी समाजाच्या पदरी निराशाच आहे .  आजही शिक्षण , आरोग्य,रोजगार आणि महिला सक्षमीकारण यांचा बोजवारा उडालेला आहे . जिजाऊ संस्था या सगळ्या मुद्द्यांवर गेली १५ वर्ष निस्वार्थपणे काम करत आहे . आदिवासी समाजाने आपल्या मुला बाळांना चांगले शिक्षण दिले पाहिजे . आपल्या आज्ञानाचा फायदा आम्ही यापुढे कोणालाही घेऊ देणार नाही हा ठाम निश्चय करून आपल्या पुढे जायचे आहे . यासाठी जिजाऊ सदैव आपल्यासाठी सोबत असेल. इथल्या व्यवस्थेवर आपल्यातलाच माणूस हवाय जो न्याय व्यवस्थेला आग्रही ठेवून समाजच्या विकासाठी काम करेल असे देखील सांबरे म्हणाले .


 

Comments