Union Budget 2023 Live Updates : पुढच्या 3 वर्षांत केंद्राकडून 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे. परदेशी पर्यटनालाही चालना मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातून आता शिक्षण क्षेत्राताही मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि कर्मचारी भरती सुरू होणार आहे. त्यासोबत सुरू असलेल्या बजेटमध्ये कर्मचारी वर्गालाही मोठा दिलासा मिळेल. शेतकरी वर्गासाठीही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.
Comments
Post a Comment