मेश्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, अश्विन मलिक मेश्राम यांच्या हस्ते पार पडला श्री सेवा मंडळातील गणपती बाप्पांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !



मुंबई - गणेश चतुर्थीनिमित्त राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. अगदी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते व दिग्दर्शक यांसह अनेक राजकीय नेत्यांच्या घरी देखील लाडके गणपती बाप्पा विराजमान झाले. त्यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनी देखील अनेक सार्वजनिक मंडळाची भेट घेत श्री गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले.
नुकताच गणेश चतुर्थी निमित्त कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरातील श्री सेवा मंडळ यांच्या वतीने गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष, श्री.अश्विन मलिक मेश्राम यांना त्यांच्या पत्नीसह श्री सेवा मंडळातील गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा बहुमान प्राप्त झाला.


अश्विन मलिक मेश्राम हे अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे संस्थापक
/अध्यक्ष असून त्यांची संस्था ही भारतातील ना-नफा संस्थांपैकी एक आहे. जी मुंबई महानगर क्षेत्रातील गोरगरीब लोकांसाठी व त्यांच्या मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार व महिला सक्षमीकरण या तत्वांवर कार्यरत आहे. ज्या माध्यमातून आजवर लाखो गरजूंना संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ झाला आहे.     


तसेच मेश्राम फाउंडेशनचे संस्थापक
/ अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम, श्री सेवा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर (बाळा) नाईक, कोषाध्यक्ष दिनेश साळुंके, कार्यवाह संतोष नाईक, मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मेश्राम फाऊंडेशनची संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती आणि बाप्पाला भोग चढवून यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. 
अगदी उत्साह आणि भक्तिमय वातावरणात हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला.

  





  

Comments