Today Gold Price : जगाच्या अर्थकारणात आता अमेरिकेचा सर्वात प्रभावी डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोनंही मोठी भरारी घेऊ शकतो. इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएन्सनुसार, मंगळवारी सोन्याचा भाव हा 50 हजारांच्या वर गेला होता. 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 57020 रूपये इतका होता त्यासोबतच 22 कॅरेट सोनं हे 55650 रूपयांवर होते. त्यानंतर 20 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोनं हे अनुक्रमे 50750 रूपये, 46180 रूपये आणि 36780 प्रति रूपये 10 ग्रॅम इतक्यावर होता. सध्या महागाईची चिंता अख्ख्या जगाला सतावते आहे. त्यासाठी भारतच नाही तर अमेरिकेतही कडक पावलं उचलली जात आहेत. त्यातून सोन्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या दृष्टीनं म्हत्त्वाचा ठरणार आहे.
आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता सोन्यात पुन्हा एकदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातून चांदीच्या दरातही खूप मोठी वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड 0105 GMT नुसार, सोन्यात 0.1% टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हॅलेन्टाईन डेला सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कमोडिटी मार्केटमध्ये 1856.47 प्रति ओंस डॉलरच्या वर होता तर US ग्लोड फ्युचर्सनुसार सोनं हे 1865.80 इतक्या पातळीवर होते. त्यामुळे डॉलरच्या तुलतेनं विचार करायचा झाला तर सोनं हे डॉलरच्या वरही चढू शकते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर सोन्यात भरारी होऊ शकते. डिसेंबर आणि त्याच्याही आधी तीन-चार महिने आरबीआयनं महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सलग अनेकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. व्याजदर वाढले. त्यातून आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीनुसार या जानेवारी महिन्यातही आरबीआयनं रेपो रेट दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. ज्याचा परिणाम सोन्यासह इतर गुंतवणूकीवरही होऊ शकतो.
जाणून घ्या आजचे रेट्स -
22 कॅरेट सोन्यात आज 100 रूपये प्रति 10 ग्रॅम घट झाली आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा भाव हा 52550 प्रति रूपये 10 ग्रॅम इतका होता. 24 कॅरेटचा विचार केला तर तोही 70 रूपये प्रति 10 ग्रॅमनं घसरला आहे. आज त्याचा भाव 57, 310 प्रति 10 ग्रॅम झाला होता.
Comments
Post a Comment