Malad Fire : मुंबईतील मालाड येथील आगीत 50 ते 70 झोपड्या खाक, एका मुलाचा मृत्यू





Slum Fire in Malad : मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला मोठी आग लागली. मालाड भागात कुरार व्हिलेज परिसरात झोपडपट्टीला ही आग लागली. ( Mumbai Fire ) जवळपास 50 ते 70 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. (Malad Fire) अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झालेत. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. मात्र मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मालाड येथील आगीत एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. 

मुंबईतील मालाड परिसरामध्ये कुरार झोपडपट्टीला आग लागली तो परिसर दाटीवाटीचा आहे. झोपडपट्टीमध्ये  मोठी आग लागल्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न  करावे लागले. सध्या घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या 4 गाड्या रवाना झाल्यात. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीत अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत तर एका लहान मुलाचा मृत्यू झाला. प्रेम तुकाराम बोरे असं या मुलाचे नाव आहे. जखमी प्रेम याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारदरम्यान या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

 


मालाडच्या कुरार गावातील झोपडपट्टीत सोमवारी लेव्हल 2 ला आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

Comments