आपण रातोरात श्रीमंत व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण यासाठी कष्ट घेणाऱ्यांची तयारी सर्वांचीच नसते. कोणतंही कष्ट न घेता अत्यंत सहजपणे आपल्याकडे पैसे यावेत असं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. पण जेव्हा असे सहजपणे पैसे मिळतात तेव्हा ते खरंच मिळालेत की कोणी आपली फसवणूक किंवा मस्करी करत आहे अशी शंकाही मनात निर्माण होते. याचं कारण म्हणजे आपण पैसे जिंकल्याचे अनेक मेसेज, ई-मेल सतत आपल्या मोबाइलवर येत असतात. त्यामुळे एखादा मेसेज खरा असला तरी त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. पण खरंच तुम्ही लखपती झाला असाल आणि खोटं समजून मेसेजकडे दुर्लक्षित केलं तर काय होईल? अमेरिकेतील एका महिलेसोबत अगदी असंच घडलं आहे.
मिशिगनच्या काऊंटी येथे (Oakland County, Michigan) राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेलाही आपण लखपती व्हावं असं वाटत होतं. पण आजकाल होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीची तिला कल्पना होती. त्यामुळेच जेव्हा अचानक मिशिगल लॉटरीच्या वतीने महिलेला ई-मेल आला तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता. या मेलमध्ये तुम्ही $110,689 म्हणजेच 91 लाख रुपये जिंकले आहात असा उल्लेख करण्यात आला होता. हा ई-मेल वाचल्यानंतर महिलेला ही फसवणूक असून कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास आपल्या खात्यातून पैसे कट होतील अशी भीती तिला वाटत होती. पण काही तासाच महिलेला फोन आला आणि तिची आपण खरंच लखपती झालो आहोत याची खात्री पटली.
ई-मेलवर विश्वास नाही बसला
मिशिगन लॉटरी कनेक्ट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, महिलेने मिशिगन लॉटरीच्या वेबसाईटवर मंथली जॅकपॉट गेम खेळला होता. यानंतर 14 डिसेंबरला लकी ड्रॉमध्ये तिचं नाव आलं आणि ती जिंकली. महिलेने आपण जॅकपॉट खेळलो आहोत, पण जिंकलो यावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच मेल पाहिल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला होता.
महिला झाली लखपती
आपण ई-मेल तपासत असताना अचानक हा मेल दिसला. फोन आल्यानंतर आपण खरंच जिंकलो आहोत यावर विश्वास बसला. यानंतर आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता असं महिलेने सांगितलं आहे. महिला नुकतंच कंपनीच्या मुख्यालयात गेली होती. तिथे तिला पैसे मिळाले आहेत. दरम्यान हे पैसे आपण घरासाठी खर्च करणार असल्याचं महिलेने सांगितलं आहे.
Comments
Post a Comment